top of page

गिरगाव चौपाटी येथील मोकळ्या किनाऱ्याच्या जागेवर “स्वराज्य भूमी” घोषित

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या आदेशानुसार “स्वराज भूमी” गिरगाव चौपाटी, मुंबई व मुंबई उपनगरातील विविध विषयांवर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर) सुधाकर शिंदे यांच्यासोबत आज रोजी एका संयुक्त बैठकीचे आयोजन खासदार गोपाल शेट्टी यांनी केले होते.

सदर बैठकीत उत्तर मुंबईतील विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबई शहरातील गिरगाव चौपाटी येथील मोकळ्या किनाऱ्याच्या जागेवर “स्वराज्य भूमी” घोषित झाली असून त्या ठिकाणी ग्लो गार्डन लाईट व साइन साऊंड व्यवस्थेसह लोकमान्य टिळक व इतर क्रांतिकारी यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या देखावे साकारणार आहेत.

१) झाडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गो गो LIGHTS PROJECTION

२) MIST SHOWERS

३) INTERNAL WALKING PATH

४) THEME BASED MURALS

इत्यादी निर्माण कार्य होणार असून या साठी महानगरपालिकेने ९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी अशी सूचना मांडली की नामांकित आर्किटेक च्या माध्यमातून ओपन डिझाईन गार्डनचे निर्माण करून मुंबई शहरातील क्रांतिकारी व देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे / लोक नेत्यांचे यथोचित स्मारक “स्वराज्य भूमी” या ठिकाणी विकसित केले जावे. जेणेकरून त्यातून मुंबई शहरात सांस्कृतिक टुरिझम ला वाढ मिळेल आणि येणाऱ्या दिवसात मुंबईकर नव्या पिढीला याच्यातून मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल.


Comentarios


bottom of page