top of page

खुर्चीसाठी वक्फ बोर्डाचे समर्थन आणि कायद्याला विरोध: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका


मुंबई, १६ ऑगस्ट २०२४: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. वक्फ बोर्डाच्या समर्थनात भूमिका घेतल्याने, उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत आहेत, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

म्हस्के म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करून उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांच्या मते, ठाकरे यांचे वक्फ बोर्डाचे समर्थन मुस्लिम मतांच्या संरक्षणासाठी करण्यात आले आहे, ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील.

म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदासाठीच्या लढाईत काँग्रेस उबाठाच्या नावाला समर्थन देत नसल्याचा उल्लेख करून, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमागे राजकीय स्वार्थ असल्याचे सांगितले. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा भूमिकेची अपेक्षा नव्हती, असेही म्हस्के म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची मागणी केली होती, असे स्मरण करून देत, म्हस्के यांनी वक्फ बोर्डाच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यांनी मतदारांना उबाठाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन, त्यांना आगामी निवडणुकीत योग्य उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

Comments


bottom of page