मुंबई, दि. 30: रस्ते अपघात कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर केला जाईल. रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी गुगलसोबत झालेल्या कराराचा फायदा करून घ्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जुनी वाहने भंगारात आणि नवीन ईव्ही धोरणराज्यातील 15 वर्षे जुनी 13,000 शासकीय वाहने भंगारात काढली जातील. तसेच, पुढील तीन वर्षांत नवीन ईव्ही धोरण आणले जाईल. राज्य परिवहनच्या बसेसला एलएनजी आणि सीएनजी प्रणाली बसवून कार्यक्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बाईक टॅक्सी आणि मॅक्सी कॅब सेवा सुरू होणारराज्यात परिवहनासाठी बाईक टॅक्सी आणि मॅक्सी कॅब सेवा सुरू केली जाईल. तसेच वडसा-गडचिरोली आणि सोलापूर-धाराशीव रेल्वे प्रकल्पांना गती दिली जाईल.
चित्रीकरणासाठी 'एक खिडकी' प्रणालीमहाराष्ट्रात चित्रपट चित्रीकरण सोपे करण्यासाठी 'एक खिडकी' प्रणालीद्वारे ऑनलाईन परवानगी दिली जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर चित्रपट निर्मिती करण्यासाठी शासनाकडून मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीस मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.