top of page

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपद नाकारले; रावसाहेब दानवेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपद नाकारले; रावसाहेब दानवेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त
किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपद नाकारले; रावसाहेब दानवेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त

मुंबई,भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची "निवडणूक आयोग संपर्क प्रमुख" म्हणून नेमणूक केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांना न विचारता ही नियुक्ती जाहीर केल्याने किरीट सोमय्या यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाच्या राज्य नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे.पत्रात किरीट सोमय्या यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी ब्ल्यू सी हॉटेल, वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत झालेल्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे, जिथे उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपाच्या नेत्यांनी त्यांना परिषद सोडण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून किरीट सोमय्या यांनी भाजपामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवले.

आपल्या पत्रामध्ये सोमय्या यांनी सांगितले की, गेल्या साडेपाच वर्षांत त्यांनी एक सामान्य सदस्य म्हणून पक्षात निष्ठेने कार्य केले आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस आणली असून, त्या काळात त्यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि पक्षाशी निष्ठा राखली.

सोमय्या यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे की, अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक पुन्हा देऊ नये आणि निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदासाठी दुसऱ्या कोणाची नियुक्ती करावी.

किरीट सोमय्या यांचा या निर्णयामुळे भाजपामध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र त्यांनी स्पष्ट केले की ते पक्षाच्या कार्यात योगदान देत राहतील, पण निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपद स्वीकारणार नाहीत.


Comments


bottom of page