top of page

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे: एकनाथ शिंदे

मुंबई,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड केला आहे. शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याच्या विचाराचा उल्लेख करून काँग्रेसने आरक्षणविरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगत, शिंदे यांनी महायुती आणि रालोआ नेहमीच आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असल्याचे नमूद केले.

शिंदे यांनी पुढे काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप केला आणि बाबासाहेबांच्या विचारांचे समर्थन करताना, काँग्रेसने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचे उदाहरण दिले. त्याचबरोबर राहुल गांधींच्या परदेशातील भारतविरोधी वक्तव्यांवरही टीका करत, त्यांनी काँग्रेसवर देशद्रोही पद्धतीने काम केल्याचा आरोप केला.

शिंदे यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचला असल्याचेही सांगितले.

bottom of page