10November 2024
मुंबई:* सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात बंडखोरी केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने कठोर पाऊल उचलले आहे. पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाने 28 बंडखोर उमेदवारांना आगामी 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
या निर्णयामुळे पक्षात पक्षशिस्त पाळण्यासाठीचा एक महत्वपूर्ण संदेश दिला जात आहे. उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता होती. काँग्रेसने याबाबत कडक भूमिका घेतल्याने पक्षाच्या शिस्तीला प्राधान्य दिले जात आहे.