top of page

उपमुख्यमंत्रीआणि प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील युवकांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील युवक पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आल्या. यावेळी नियुक्ती पत्रही देण्यात आले.आज मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी राकेश कामठे, प्रदेश सरचिटणीसपदी महेश हांडे, सचिन जाधव, गजानन खामितकर सूर्यवंशी, पुणे शहराध्यक्षपदी समीर चांदेरे, पुणे शहर कार्याध्यक्षपदी मनोज पाचपुते आणि अब्दुल हाफीज शेख यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षसंघटन बळकट करण्यासाठी या सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करून अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments


bottom of page