12 January 2025
ठाणे: रेमंड कंपनी आणि सुपर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑटोफेस्ट-2025’ या भव्य ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा अनुभव घेत, त्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच रेमंड उद्योग समूहाचे मालक गौतम सिंघानिया उपस्थित होते. विविध नामांकित ब्रँड्सच्या गाड्या, स्पोर्ट्स बाईक्स, इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले होते.
या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी भारतातील वाहन उद्योगातील प्रगतीचे कौतुक केले. “ऑटोमोबाईल क्षेत्र हे केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचे योगदान देत आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचते,” असे ते म्हणाले.
रेमंड उद्योग समूहाचे मालक गौतम सिंघानिया यांनी यावेळी सांगितले की, “ऑटोफेस्टसारख्या कार्यक्रमांद्वारे आम्ही उद्योग आणि ग्राहकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या फेस्टिव्हलमध्ये गाड्यांच्या टेस्ट ड्राइव्हपासून ते स्पर्धा आणि सवलतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आकर्षणाचा केंद्रबिंदू:
• स्पोर्ट्स कार आणि बाईकचे थरारक प्रदर्शन
• इलेक्ट्रिक वाहनांची नवीन श्रेणी
• थेट रिक्षा चालवण्याचा अनुभव
ऑटोप्रेमींना हा फेस्टिव्हल नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव देईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
Video