top of page

आसियान-भारत मालव्यापार कराराची चौथी बैठक मलेशियातील पुत्रजया येथे संपन्न


आसियान-भारत मालव्यापार कराराच्या पुनरावलोकनाची चौथी बैठक 7 ते 9 मे 2024 या कालावधीत मलेशियातील पुत्रजया इथे झाली. या बैठकीत भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि मलेशियाच्या गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उप महासचिव (व्यापार) मस्तुरा अहमद मुस्तफा, ह्यांनी सह-अध्यक्षपदी ठरवले.

आसियान (ASEAN- Association of South East Asian Nations) ही दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय आशियाई राष्ट्रसमूहाची संघटना असून, AITIGA (ASEAN-India Trade in Goods Agreement) या करारासाठी संयुक्त समितीने पुनरावलोकन केले.

पुनरावलोकनामध्ये करारामधील विविध धोरणात्मक क्षेत्रे हाताळण्यासाठी एकूण 8 उपसमित्यांची स्थापना केली आणि यापैकी 5 उपसमित्यांनी चर्चा सुरू केली. सर्व 5 उपसमित्यांनी त्यांच्या चर्चेची फलनिष्पत्ती, AITIGA च्या चौथ्या संयुक्त समितीला कळवली आहे.

भारताच्या जागतिक व्यापारात 11% वाटा असलेला आसियान हा राष्ट्रसमूह, भारताच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे. 2023-24 मध्ये हा द्विपक्षीय व्यापार 122.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका होता.

संयुक्त समितीच्या पाचव्या बैठकीसाठी दोन्ही बाजूंची पुढील बैठक, इंडोनेशियात जकार्ता इथे 29 ते 31 जुलै 2024 दरम्यान होईल.

या बैठकातील महत्वपूर्ण ठिकाणी मंडळ निर्णय करण्यात आला आहे ज्यामुळे आसियान-भारत मालव्यापार कराराच्या सहमतीला एक नवीन दिशा मिळविण्याची संधी साधली जाणार आहे.

Kommentare


bottom of page