On the occasion of the 76th anniversary of Indian Independence, the Administrator and General Manager of BEST, Shri. The flag was hoisted with the auspicious hand of Vijay Singhal.
The General Manager congratulated BEST's bus passengers and electricity customers as well as all Mumbaikars on the occasion of Independence Day. Speaking on the occasion, he said that the expectations of all Mumbai taxes have increased from us for better service and he expressed his belief that with the cooperation of all officers and employees, we can fulfill all these expectations more efficiently.
The ceremony was attended by a large number of officers and employees of BEST.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात बेस्ट उपक्रमाचे प्रशासक तथा महाव्यवस्थापक माननीय श्री. विजय सिंघल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
बेस्टच्या बस प्रवाशांना आणि वीज ग्राहकांना तसेच तमाम मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनानिमित्त महाव्यवस्थापक यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की समस्त मुंबई करांच्या आपल्या कडून अधिक चांगल्या सेवेच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने या सर्व अपेक्षा अधिक सक्षमतेने पूर्ण करू शकु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.