top of page

"Chief Minister Medical Fund Gets App & WhatsApp Helpline, Inaugurated by Eknath Shinde"


12 thousand 500 patients benefited in one year under the scheme

Mumbai, Chief Minister Mr Eknath Shinde today inaugurated the mobile app and WhatsApp helpline for the beneficiary patients of Chief Minister Medical Assistance Fund. A Celebration Anand Melawa of the patients who have been successfully treated from different chronic and life threatening diseases and their relatives was also organized at the Sahyadri guest house during the occasion. The patients and their relatives can contact on helpline number 8650567567 for assistance.

Deputy Chairperson of State Legislative Council Dr Neelam Gorhe, Skill development Minister Mangal Prabhat Lodha, principal secretary of Chief Minister Vikas Kharge, Secretary of State Legislature Jitendra Bhole, Chitra Wagh, chief of the Chief Minister assistant cell Mangesh Chiwate and other dignitaries were present on the occasion.

In the last one year and a month, 12 thousand 500 patients have been benefited through the Chief Minister Assistance Fund Cell. More than 100 crores of financial assistance was disbursed to these patients, the Chief Minister informed.

The fifth edition of Medical Assistance guide and a book named Rokh Thok based on the thoughts of Balasaheb Thackeray were released on the occasion during this get together celebration. The beneficiaries of the Chief Minister medical assistance fund said that it was because of the Chief Minister Mr Eknath Shinde that they got a new life. Documentary taking stock of the functioning of the Chief Minister Assistance cell in the last one year was also screened during the program.

No counting while extending help says chief minister

Chief Minister Mr Shinde speaking further said that the government has taken the decision to provide free tests and treatment at all the government hospitals to each and every citizen of the state. He said that this scheme has been implemented from today, 15th August. He further said that while extending the financial assistance through the Chief Minister’s Relief Fund we did not even understand when we crossed the figure of 100 crore rupees while disbursing funds for the benefit of the needy. He said, “Whenever I extend my hand for help, I do not believe in counting or measuring because assistance fund is my favorite subject and though there are many occasions when criteria are not met, when it comes to medical assistance, I try to find some way out to extend the assistance.”

He said that after his government took the reins of the state, right from the first meeting care was taken that farmers, laborers, peasants, workers, women, students, or any constituent of the society is not deprived from the government schemes. He said that the government and the administration are concentrating on this, with priority.

Mr Shinde further said that the limit of insurance cover under the Mahatma Phule Jeevandaai Arogya Yojana has been extended to 5 lakh from 1.5 lakh. He said that the government has taken the historical decision to implement this scheme for each and every citizen of the state. He also said that his government has taken efforts to take ahead all the stalled projects and they are in progress. Many of them are completed or near completion,he said.


"मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतर्फे मोबाईल अॅप आणि व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सुरू, श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन"

मुंबई, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, श्रीमती चित्रा वाघ, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित 'रोखठोक' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशी भावना यावेळी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत एक वर्षातील आढावा घेणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली.

मदतीचा हात पुढे करताना, मोजमाप नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटीचा आकडा कधी पोहोचला हे समजले सुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाही मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो. आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले आहे.

आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे. एक सही एखाद्याला उपचार देत असेल त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात असे मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात. कोरोना काळात आपली माणसं परकी झाली होती. या परिस्थितीमध्ये कोरोना काळात एक टीम म्हणून काम केलं. कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलेलं नाही असेही त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आपण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होत आहे. महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले असून त्यामुळे राज्यात रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना स्वतः सेवेचे दूत बनून लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख श्री चिवटे यांनी राज्यातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही असे यावेळी सांगितले.


bottom of page